भारत वि. दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी20 सामन्यात 82 धावांनी भारताचा विजय विजयासोबत भारताने मालिकेत साधली बरोबरी दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय़ पण हार्दिकने 31 चेंडूत 46 धावा तर दिनेशने 27 चेंडूत 55 धावा केल्या ज्यामुळे विजयासाठी द. आफ्रिकेसमोर भारताने 170 धावांचे लक्ष्य ठेवले. 170 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवातच खराब आवेश, हर्षल पटेलसह चहलने सुरुवातीपासून उत्तम गोलंदाजी केली. सर्वच भारतीय गोलंजदाजांनी भेदक गोलंदाजी केली. आवेश खानने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकात 18 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तर कर्णधार बावुमा दुखापतीमुळे खेळू शकला नाही. ज्यामुळे 87 धावांच्या मोठ्या फरकाने भारताने सामना जिंकला.