देशात देशात नवीन कोरोना रुग्णांसह मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
देशात गेल्या 24 तासांत 21 हजार 411 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी दिवसभारत 67 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण आधीच्या दिवसाच्या तुलनेनं जास्त आहे.
गुरुवारी देशात 21 हजार 880 कोरोनाबाधित आढळले होते आणि 60 रुग्णांचा मृत्यू झाला.
देशात कोरोनाबाधितांसह कोरोनाबळींच्या संख्येतही वाढ झाली आहे.
भारतात गेल्या 24 तासांत 67 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे, 20 हजार 726 कोरोनााबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात कोरोना महामारी सुरु झाल्यापासून एकूण 5 लाख 25 हजार 997 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अशातच महाराष्ट्रात (Maharashtra) ओमायक्रॉनचा (Omicron) सबव्हेरियंट बीए.5 (Sub Variant BA.5) ची लागण झाल्याले रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.