देशातील कोरोनाचा संसर्गात चढ-उतार पाहायला मिळात आहे



देशात सोमवारी कोरोनाबाधितांमध्ये मोठी घट दिसून आली होती, पण आज पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे



देशात मंगळवारी दिवसभरात 9,062 नवीन कोरोना रुग्णांनी नोंद झाली आहे



सोमवारच्या तुलनेनं कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की, देशात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून कमी रुग्ण आढळले आहेत.



दुसरी चांगली बाब म्हणजे नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 15 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचाराधीन आहेत



गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 5 हजार 58 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मंगळवारी दिवसभरात देशात 15 हजार 220 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.



आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत एकूण 4 कोटी 36 लाख 54 हजार 64 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत



देशात मंगळवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 25 लाख 90 हजार 557 डोस देण्यात आले आहेत.