भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर मालिका सुरु आहे. पहिला सामना नुकताच भारताने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता मालिकेत दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी सर्वच खेळाडूंनी कसून सराव सुरु केला आहे. बीसीसीआयनं खेळाडूंचे सरावादरम्यानचे फोटो शेअर देखील केले आहेत. या सामन्यात भारत नेमकी कोणती प्लेईंग 11 घेऊन उतरतो ते पाहावे लागेल. कारण श्रेयस अय्यर संघात परतल्यामुळे नेमकी अंतिम 11 आता निवडावी लागेल. त्यात दिल्लीच्या मैदानात भारताचा रेकॉर्ड फार खास असल्याने भारत विजयासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार आहे. 1987 पासून भारताने दिल्लीत एकही कसोटी सामना गमावलेला नाही.