भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटीतील दुसऱ्या दिवशीचा खेळ आटोपला.



दिवसअखेर भारताने 7 गडी गमावत 321 धावा ठोकल्या आहेत.



पहिल्या दिवशीच्या अखेरीस भारत 77 वर 1 बाद अशी अवस्था भारताची होती.



दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहितच्या शतकाने भारताचा डाव सावरला.



ऑस्ट्रेलियाच्या टॉड मर्फीने पाच विकेट्स सलामीच्या सामन्यात घेतले.



दुसरीकडे अक्षर आणि जाडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 144 धावांची आघाडी घेतली आहे.



ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर आटोपला होता.



यावेळी जाडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या.



तसंच अश्विनने 3 विकेट्स घेतल्या होत्या.



एकंदरीत सध्यातरी भारत सामन्यात दमदार स्थितीत आहे.