भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील सलामीच्या कसोटी भारताचा मोठा विजय नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात पार पडला सामना सामना भारतानं सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकानं जिंकला. या विजयासह मालिकेत 1-0 ची आघाडी भारतानं घेतली आहे. सामन्यात सुरुवातीपासून भारतानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. ज्यात ऑस्ट्रेलियाला 177 धावांत सर्वबाद करुन भारतानं पहिल्या डावात 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 91 धावांत आटोपत सामना 1 डाव आणि 132 धावांनी जिंकला आहे. भारताकडून रवींद्र जाडेजाने दोन्ही डावात मिळून 7 तर अश्विननं दोन्ही डावांत मिळून 8 विकेट्स घेतल्या. याशिवाय कॅप्टन रोहित शर्माने 120 तर अक्षर पटेल 84 आणि रवींद्र जाडेजा 70 यांनी सर्वाधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकीपटू टॉड मर्फीने एका डावातच 7 विकेट्स घेत चांगली कामगिरी केली.