जोशीमठ पाठोपाठ काश्मीरमध्ये डोडा जिल्ह्यात जमीन खचण्याचे प्रकार होत आहेत
डोडा जिल्ह्यात नई बस्तीमध्ये घरे खचल्याने तब्बल 300 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील नई बस्ती गावात जमीन खचण्याचे प्रकार होत आहेत.
डोडा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून नई बस्ती हे गाव 35 किलोमीटरवर आहे.
म्हणजे हा परिसर चिनाब नदीच्या खोऱ्यातील.
हा प्रदेश पहिल्यापासून म्हणजे 1988 आधी जमीन खचणारा म्हणून ओळखला जायचा.
पण गेल्या अनेक वर्षांपासून एवढ्या भीषण पद्धतीने जमीन खचलेली नाही.
त्यामुळे या परिसरात नवी बांधकामे झाली. घराची वस्ती झाली,
त्यालाच नई बस्ती अशी ओळख मिळाली.
नई बस्ती गावातील हे दुमजली घर अशा पद्धतीने खचलंय
की आता त्याची पुनर्बांधणीही शक्य नाही. या घरातील लोकांना कायमचं विस्थापीत व्हावं लागलं आहे