हर घर तिरंगा रॅलीचं दिल्लीत आयोजन!

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील गाडी चालवत या रॅलीत सभाग नोंदवला

जेव्हा कुठेही तिरंगा (Tiranga Flag) फडकत असतो ते दृश्य आपल्याला सुखावणारे असते.

पण हाच तिरंगा लाल किल्ल्यावर फडकताना पाहून तर आपल्यामध्ये एक प्रकारची अभिमानाची भावना निर्माण होते.

आपल्या देशात अधिकृत प्रदर्शनासाठी सर्व प्रसंगी तिरंगा ध्वज हा केवळ भारतीय मानक ब्युरो द्वारे

निश्चित केलेल्या वैशिष्ट्यांशी सुसंगत असेल आणि त्यांच्या मानक चिन्हासह

ध्वज वापरला जाईल असं फ्लॅग कोडमध्ये सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने 30 डिसेंबर 2021 रोजी काढलेल्या आदेशान्वये

भारतीय ध्वज संहिता, 2002 मध्ये सुधारणा केली आहे.

भारतीय राष्ट्रध्वज हा हाताने विणलेला किंवा मशिनच्या माध्यमातून तयार केलेला असेल असं सांगण्यात आलं आहे.