भारतीय महिलांचा श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 10 विकेट्सनी विजय भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. निर्णयाप्रमाणे भारतीय महिलांनी भेदक गोलंदाजी करत 172 धावांवर श्रीलंकेच्या महिलांना सर्वबाद केलं. श्रीलंकेकडून अमा कंचनाने सर्वाधिक 47 धावा केल्या. भारताकडून रेणुका सिंहने सर्वाधिक 4 तर मेघना सिंह आणि दिप्ती शर्मा यानी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. 174 धावांच आव्हान पूर्ण करण्यासाठी आलेल्या भारतीय महिलांनी केवळ 25.4 षटकातच विजय मिळवला. यावेळी स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा जोडीने तुफान अशी नाबाद 174 धावांची भागिदारी उभारली. यावेळी मंधानाने 83 चेंडूत 91 तर शेफालीने 71 चेंडूत 71 धावा करत आव्हान पूर्ण केलं. ज्यामुळे तब्बल 10 विकेट्सनी भारताचा विजय झाला. रेणुका सिंहच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे तिला प्लॅअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं.