भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रविवारी सामना होणार आहे. दोन्ही संघात 2 सप्टेंबर रोजी झालेला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता सुपर 4 मधील सामन्यावरही पावसाचे सावट आहे. रविवारी होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबो येथे होणार आहे. कोलंबोमध्ये मुसळधार पावसाने सुरु आहे. त्यामुळे मैदान आणि खेळपट्टी तयार करण्यास अडथळा येत आहे. पावसाने विश्रांती घेतली नाही, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही रद्द होऊ शकतो. रविवारी कोलंबोमध्ये 70 टक्केंपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तानविरोधात 2 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात हार्दिक-इशान यांनी दमदार फलंदाजी केली. हार्दिक पांड्याने 87 धावांची वादळी खेळी केली होती. इशान किशन याने 82 धावांचे योगदान दिले होते. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि रविंद्र जाडेजा फ्लॉप गेले होते.