आशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारतीय संघाची अव्वल फळी फेल झाली.



त्यानंतर मात्र युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने हार्दिक पांड्यासोबत शानदार खेळी करत भारताची बुडती नौका वाचवली.



महत्त्वाच्या सामन्यात ईशानच्या उत्कृष्ट फलंदाजीचे कौतुक होत आहे.



ईशान किशनची कथित गर्लफ्रेंड अदिती हुंडियानेही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.



आदिती हुंडिया आणि ईशान किशन यांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेलं आहे. याच कारणामुळे आदिती हुंडिया ही ईशान किशनची गर्लफ्रेंड असल्याचं मानलं जात आहे.



मात्र, आजपर्यंत दोघांनीही याबाबत खुलासा केलेला नाही.



पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर आदिती हुंडियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास स्टोर शेअर केली होती.



ईशान किशन मैदानात फलंदाजी करत असलेला फोटो पोस्ट केला होता.



आदिती हुंडियाने लिहीलं की, 'ड्रीम इनिंग्स... तू या प्रत्येक गोष्टीसाठी पात्र आहेस' यासोबत तिने हार्ट इमोजीही पोस्ट केला होता.



ईशान किशनच्या फोटोसह इंस्टाग्रामवर हार्ट इमोजी शेअर करणारी आदिती हुंडिया ही व्यवसायाने मॉडेल आहे.