पाकिस्तानविरोधात सुरु असलेल्या सामन्यात रोहित शर्मानं अनोखा विक्रम केलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामी फलंदाज म्हणून 300 सामने खेळण्याचा विक्रम रोहितने केलाय. रोहित शर्माने विरेंद्र सेहवाग-सचिनच्या पंक्तीत स्थान पटकावलेय. भारताकडून सर्वाधिक सलामीला खेळण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने कसोटी, टी20 आणि वनडेमध्ये टीम इंडियाकडून सलामीला फलंदाजी केली. रोहित शर्माने सलामीला 39 शतके ठोकली आहेत. पाकिस्तानविरोधात रोहित शर्माने वादळी फलंदाजी केली. रोहित शर्माने पाकिस्तानविरोधात अर्धशतक ठोकले. रोहित शर्माने वनडेमध्ये 50 अर्धशतके ठोकली आहेत.