भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर खेळला जातोय.



या मालिकेतील पहिला सामना भारतानं जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंनं विजय मिळवला आहे.



ज्यामुळं तिसरा एकदिवसीय सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.



याच पार्श्वभूमीवर भारताची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे.



दुखापतीमुळं जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर झालाय.



त्याच्याऐवजी युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) संघात स्थान देण्यात आलीय.



नाणेफेक करण्यासाठी मैदनात आलेल्या भारताचा कर्णधार रोहित शर्मानं याबाबत माहिती दिली.



इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत जसप्रीत बुमराहनं जबरदस्त कामगिरी करून दाखवली.



या मालिकेत त्यानं 8.92 च्या सरासरीनं आणि 3.92 च्या इकोनॉमी रेटनं सर्वाधिक 8 विकेट्स घेतल्या.



या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यानं त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली.