पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा कसून सराव सुरु संपूर्ण संघ भारतात पोहोचला असून सरावही सुरु केला आहे. प्रसिद्ध आणि महत्त्वाची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ सज्ज एकीकडे कांगारुंच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडनंतर आता कॅमेरॉन ग्रीनही पहिल्या कसोटीला मुकणार असल्याचं समोर दरम्यान या सर्व अडचणीनंतर देखील उर्वरीत संघ मैदानात घाम गाळताना दिसत आहे. फलंदाजांसह गोलंदाज सर्वच मैदानात उतरले असून कसून सराव करत आहेत. यावेळी स्टाफही त्यांना संपूर्ण सपोर्ट करत आहे. दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात यंदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत. दुसरीकडे टीम इंडिया देखील कसून सराव करत असून रवींद्र जाडेजाच्या परतण्याने संघाची ताकद आणखी वाढली आहे.