भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी अश्विननं इतिहास रचला आहे.



अश्विननं सामन्यात पहिली विकेट घेताच खास रेकॉर्ड नावावर केला आहे.



त्यानं 450 कसोटी विकेट्स पूर्ण केले आहेत.



विशेष म्हणजे जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीनं विकेट पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.



त्याने 89 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे.



त्याच्या आधी केवळ श्रीलंकेचा दिग्गज मुरलीधरन याने 80 सामन्यांत हा रेकॉर्ड केला आहे.



ज्यामुळे त्यानं शेन वॉर्नसारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे.



याशिवाय भारताकडून अशी कामगिरी करणाऱ्यांच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे.



त्याच्याआधी केवळ अनिल कुंबळेने ही कामगिरी केली आहे.



याशिवाय सर्वात कमी चेंडू फेकून ही कामगिरी करणाराही अश्विन दुसरा खेळाडू आहे.