सुदृढ आरोग्यासाठी हिवाळा हा ऋतू महत्त्वाचा असतो

थंडीला सुरवात झाली की अनेकांच्या घरात विविध पदार्थांची तयारी सुरु होते.

मुख्य म्हणजे थंडीच्या दिवसात बहुतांश घरात सुक्या मेव्याचे लाडू बनवले जातात.

याकरीता बाजारेपठेत काजू, बदामसोबतच मेथी, डिंक आणि नुसते सुकामेव्याचे लाडू विक्रीसाठी येतात.

ग्राहकांकडूनही या रेडीमेड लाडूंना चांगलीच डिमांड असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी जाणवते.

या कडाक्याच्या थंडीत सुका मेवा, डिंक, मेथी या पासून बनवलले लाडू शरिराला ऊर्जा देता.

मेथी ही उष्ण असल्याने थंडीच्या दिसत तिचे सेवन केल्याने ऊर्जा मिळण्यास मदत होते.

तसेच थंडीच्या दिवसात भूक देखील जास्त लागते.

या दिवसात पौष्टिक लाडूचे सेवन केल्याने पोटाला आधार मिळतो.