IMFच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ पंतप्रधानांना भेटल्या, भेटीत नेमकी काय चर्चा झाली?







49 वर्षीय भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी जानेवारी 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञपदाची सूत्रं स्वीकारली आहेत.



'आयएमएफ' (इंटरनॅशनल मॉनिटरी फंड) च्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला प्रमुखपद देण्यात आलं आहे.



मागील काही दिवसांपूर्वी पिछले दिनों आयएमएफनं सांगितलं होतं की, गीता गोपीनाथ येत्या जानेवारीत आपली नोकरी सोडून हार्वर्ड यूनिवर्सिटी मध्ये परतणार आहेत.



गीता गोपीनाथ यांनी भारतातील कृषी क्षेत्रात मोठ्या सुधारणांची गरज असल्याचं सांगत रद्द केलेल्या केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचं समर्थन केलं होतं.



पण हे समर्थन करताना त्यांनी शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षेची पूर्ण हमी देण्याची गरज असल्याचंही मत व्यक्त केलं होतं.



गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत. त्या आधी त्यांनी हॉवर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र या विषयात अध्ययनाचं काम केलं आहे.



मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या गीता गोपीनाथ या सध्या अमेरिकन नागरिक आहेत.



गीता गोपीनाथ यांनी आपली पदवी दिल्ली विद्यापीठातून प्राप्त केली. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकनॉमिक्स आणि यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन येथून केलं.