ख्रिसमसला केक बनवला नाही तर मग काय मजा त्या सणाची. ख्रिसमसला अनेक प्रकारचे केक बनवले आणि खाल्ले जातात. जाणून घ्या ख्रिसमस केक घरी कास बनवायचा. रवा आणि दही एकत्र करून तीन तास भिजत ठेवावे. त्यानंतर क्रीम, बटर आणि साखर रव्याच्या मिश्रणात टाकावे. नंतर अंड्यातील पिवळा बल्क त्यात टाका. सर्व कोरड्या पदार्थांचे चांगले मिश्रण करून घ्या. अंड्याचा पांढरा भाग मऊ होईपर्यंत फेटावे. त्यानंतर या बॅटर मध्ये फळे आणि अंड्यातील सफेद भाग टाकावा. त्यानंतर बॅटरला भांड्यात टाकून 155 डिग्री सेल्सियसवर 40 मिनिटे शिजवावा.