मॅक्सवेलच्या द्विशतकाच्या बळावर ऑस्ट्रे्लियाने अफगाणिस्तानचा पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाची यंदाच्या विश्वचषकातील आतापर्यंतची कामगिरी पाहूयात चेन्नईच्या मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सने पराभव केला. दक्षिण आफ्रिकेनेही ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पाच विकेट्सने पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दुबळ्या नेदरलँड्सचा 309 धावांनी दारुण पराभव केला. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने गतविजेत्या इंग्लंडला 33 धावांनी हरवले. 11 नोव्हेंबर रोजी बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पुण्यात सामना होणार आहे.