केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेला दरवर्षी लाखो उमेदवार हजेरी लावतात. यातील काहींच्या स्टोरी खूप प्रभावी आणि प्रेरणादायी असतात.यातलंच एक नाव आहे IAS सोनल गोयल (Sonal Goel) यांचं. सोनल गोयल आयएएस म्हणून आपल्या कामात डॅशिंग आहे,तर दुसरीकडे सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर एखाद्या अभिनेत्रीपेक्षाही सोनलचा करिष्मा जास्त आहे. तिचे इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर लाखो फॉलोअर्स आहेत. ती सतत आपले सुंदर फोटो देखील शेअर करत असते. सोनल गोयल ही हरियाणाच्या पानिपतमधील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी. सोनल गोयलने यूपीपीएससी परीक्षेत 13 वी रँकिंग मिळवून आयएएस होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले. सोनल गोयलने कधीही आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. तिचं आयएएस अधिकारी होणं हा खरंतर योगायोग म्हणावा लागेल. तिला नागरी सेवा परीक्षेबद्दल फारशी माहितीही नव्हती. पण एकदा तिनं एका मासिकात प्रशासकीय सेवेवरचा लेख वाचला. या लेखामुळे तिला आयएएस अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर सोनलने आयएएसच्या परीक्षा देऊन अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. सोनलने 2007 मध्ये कठोर परिश्रमाने दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि यावेळी ती 13 वी रँक घेत आयएएस म्हणून सिलेक्ट झाली.