आजकाल मुलींसाठी हाय हिल्स घालणे हा फॅशनचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
हाय हिल्समुळे एक परफेक्ट लुक मिळतो.
मात्र काही मुली अजूनही काही मुलींना हाय हिल्स घालणे अवघड जाते.मात्र काही टिप्स फाॅलो करून तुम्ही हाय हिल्स घालू शकता.
बऱ्याच मुलींना हाय हिल्स घालण्याची सवय नसते. त्यामुळे त्यांच्या टाचा आणि पाय दुखायला लागतात.
अशा वेळी हाय हिल्स घालून घरी चालण्याचा सराव करावा.
काही वेळेस आपण चुकीच्या हाय हिल्सची खरेदी करतो आणि आपल्याला त्रास व्हायला लागतो.त्यामुळे चांगल्या ब्रँडच्या हाय हिल्स घेणे गरजेचे आहे.
हाय हिल्सची सवय लावण्याकरता आधी ब्लाॅक हिल्स घालण्याची सवय लावा.
हिल्स घातल्यानंतर अंगठ्याऐवजी टाचांवर जोर देऊन चालण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्हाला पहिल्यांदा हिल्स घालायची असतील तर पम्प्स घालणे सुरक्षित असेल.
सुरूवातीस अतिशय कमी इंचाच्या हिल्स घाला.