नव्या विषाणूमुळे जगाची चिंता वाढली आहे. कोविड19 विषाणूनंतर आता कॅमल फ्लूने टेन्शन वाढवलं आहे. शास्त्रज्ञांना हा विषाणू जगभरात पसरेल अशी भीती आहे.
ABP Majha

नव्या विषाणूमुळे जगाची चिंता वाढली आहे. कोविड19 विषाणूनंतर आता कॅमल फ्लूने टेन्शन वाढवलं आहे. शास्त्रज्ञांना हा विषाणू जगभरात पसरेल अशी भीती आहे.

जग आता कुठे कोरोना विषाणूच्या संसर्गातून बाहेर पडताना दिसत आहे. जगभरात कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण झाली. लाखो लोकांनी कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमावला.
ABP Majha

जग आता कुठे कोरोना विषाणूच्या संसर्गातून बाहेर पडताना दिसत आहे. जगभरात कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण झाली. लाखो लोकांनी कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमावला.

सध्या कोरोनाचा वेग मंदावला असला, तरी धोका मात्र कायम आहे. तोच आता पुन्हा एका नव्या धोकादायक विषाणूचं सावट घोंघावत आहे.
ABP Majha

सध्या कोरोनाचा वेग मंदावला असला, तरी धोका मात्र कायम आहे. तोच आता पुन्हा एका नव्या धोकादायक विषाणूचं सावट घोंघावत आहे.

आता कॅमल फ्लू विषाणू जगभरात पसरेल अशी शास्त्रज्ञांना भीती वाटत आहे.
ABP Majha

आता कॅमल फ्लू विषाणू जगभरात पसरेल अशी शास्त्रज्ञांना भीती वाटत आहे.

ABP Majha

कॅमल फ्लू अतिशय वेगाने पसरणारा रोग आहे. हा विषाणू औषधांचा शरीरावर होणारा परिणाम पाहता म्यूटेट होतो, म्हणजे स्वत:ची रचना बदलतो. त्यामुळे कॅमल फ्लूमुळे जगभरातील शास्त्रज्ञ चिंतेत आहेत.

ABP Majha

कॅमल फ्लू कोरोना विषाणूप्रमाणेच संसर्गजन्य आजार आहे. या आजाराची लागण कॅमल म्हणजे उंटापासून माणसाला झाली आणि त्यातून त्याचा अधिक प्रसार झाला. आता संपूर्ण जगावर कॅमल फ्लूचं सावट आहे.

ABP Majha

कतारमध्ये कोविड सारख्या अतिशय संसर्गजन्य अशा विषाणूचा संसर्ग झाला आहे. सध्या सौदी अरेबियातील कतार येथे सध्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

ABP Majha

जगभरातील फुटबॉल चाहते फिफासाठी कतारमध्ये पोहोचले आहेत. मात्र या चाहत्यांद्वारे हा नवा विषाणू जगभरात पसरेल, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

ABP Majha

कतारमध्ये कॅमल फ्लू या रोगाचा प्रसार होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता जगाचं लक्ष कतारकडे लागलं आहे

हा विषाणू उंटापासूनच लोकांपर्यंत पसरतो. कतारमध्ये फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक पाहण्यासाठी जगभरातून लोक पोहोचत आहेत.

लोक उंटावर स्वार होऊन त्यांच्या संपर्कात येत आहेत. अशा परिस्थितीत हा विषाणू अधिक लोकांपर्यंत पसरू शकतो. फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी कतारला जाणाऱ्या प्रवाशांना सफारी आणि राइड दरम्यान उंटांना हात न लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.