आहारातील कोणतीही गोष्ट शुद्ध असणं फार गरजेचं असतं. अनेकदा आपल्याला तुपातील भेसळ ओळखता येत नाही. तुपाची शुद्धता ओळखण्यासाठी काही सोप्या टीप्स तुम्ही फोलो करु शकता. त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विकत आणलेले तूप गरम करुन घाला. जर हे तूप पाण्याच्या वाटीमध्ये तळाला गेले तर समजा हे तूप बनावट आहे. तुम्ही जमिनीवरील पाण्यात देखील तूप मिसळले तरी ते पाण्यावर तरंगत. तसेच जर तूप हातावर घेतल्यावर लगेच पाघळले तर समजा हे तूप बनावट आहे. बनावट तेलामध्ये तुम्हाला तेलाचा देखील वास येऊ शकतो. तर मीठामुळे देखील तुपाची शुद्धता ओळखण्यास मदत होऊ शकते. जर तुपामध्ये मीठ घातले आणि त्याचा रंग निळा झाला तर समजा हे तूप बनावट आहे.