केळ्यामध्ये अनेक पोषण तत्वे असतात.

केळ्यासोबत केळ्याच्या सालीमुळे देखील अनेक फायदे मिळण्यास मदत होऊ शकते.

केळ्याच्या सालामध्ये जीवनसत्त्व B6, B12, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखी पोषणत्त्वे आढळून येतात.

त्वचा सुंदर आणि चकचकीत करण्यासाठी केळ्याचे साल फायदेशीर ठरु शकते.

यामुळे डोळ्यांच्या खाली झालेली वर्तुळं देखील कमी करण्यास मदत होते.

केसासाठी देखील केळ्याच्या सालाचा उपयोग केला जाऊ शकतो.

यामुळे केस मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते.

केळ्याचे साल दात आणि हिरड्यांसाठी देखील फायदेशीर ठरु शकते.

केळ्याच्या सालामुळे कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

तसेच यामुळे पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत होऊ शकते.