दिवसांगाणिक सायबर गुन्ह्याचे प्रकार घडत असतात.

त्यातील बहुतांश वेळी दुसऱ्याच्या नावाचे सिमकार्ड वापरण्यात येतात

तुम्हाला तुमच्या नावावर किती सिमकार्ड हे ठाऊक आहेत का?
तर तुम्ही हे जाणून घेऊ शकता केवळ एका क्लिक वर

या करीता शासनाने संचार साथी नावाचे पोर्टल तयार केले आहे

या पोर्टलच्या माध्यमातून तुमच्या नावावर किती सिम आहे हे माहिती करून घेऊ शकता

या करीता युजर्सला संचार साथी पोर्टलवर( tafcop.sancharsaathi.gov.in) वर जावे लागेल

त्यानंतर युजर्सला आपला रजिस्टर मोबाईल नंबर एंटर करावा लागेल

त्यानंतर त्यातील कैप्चे एंटर करावा लागेल

त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल, तो तेथे एंटर करावा लागेल.

त्यानंतर तुमच्या नावे ऍक्टिव्ह सिम दिसतील त्यानंतर सिम रिपोर्ट किंवा ब्लॉक करू शकता

मात्र हे करत असताना ओटीपी, URL आणि मेसेज सावधगिरी बाळगावी

अनेक खोटी डोमेन आणि वेबसाईट तयार करून फसवणूक केली जाऊ शकते