आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी उपवास करण्याची पद्धत असून या व्रताला कोजागरी व्रत असं म्हणतात. या दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी आणि इंद्र देवाची पूजा करावी. पूजेनंतर रात्री चंद्राला दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटवून त्यामध्ये केशर, पिस्ता, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ तसेच साखर घालून दूध तयार करावं. हे दूध चंद्रप्रकाशात ठेवावं. त्यानंतर ते देवाला अर्पण करावे. यासोबत साजूक तुपात बनवलेल्या तांदळाच्या खीरीचा नैवेद्य दाखवावा. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी केले जाते. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला सूख-समृद्धी लाभते.