'अटल ब्रिज' देशातील सर्वात लांब समुद्री पूल आहे. ज्याची लांबी 21.8 किमी. आहे.



या ब्रिज चा 16.5 किमी. चा हिस्सा समुद्रातून तर 5.5 किमी. हिस्सा जमिनीवरून बनलेला आहे.



मुंबई ट्रांस हार्बर लिंकवरून जाण्यासाठी 250 रुपये टोल द्यावा लागेल आणि



रिटर्न ट्रिपसाठी 375 रुपये टोल आकारला जाणार आहे.



राज्य सरकार 1 वर्षांनंतर टोलचे समिक्षण करेल.



याच्या तुलनेत बांद्रा - वरळी सी लिंक ला सिंगल ट्रिप साठी 85 रुपये तर रिटर्न ट्रिपसाठी 127 रुपये टोल आकारला जातोय.



मुंबई ट्रांस हार्बर लिंक वरून जाण्यासाठी महिन्याचा पास 12,500 रुपयांचा पास असेल.



या रस्त्यावरून जायला मोटरसायकल, ऑटोरिक्षा आणि ट्रॅक्टर या वाहनांना बंदी असेल.



या ब्रिज ला बनवायला जवळपास 177,903 मेट्रिक टन स्टील आणि 504,253 मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आले आहे.



या ब्रिज ला दोन ठिकाणी लिंक केले गेले आहे. पहिला एरोली-मुलुंड कनेक्टर तर दुसरा वाशी कनेक्टर आहे.