जगातले अनेक असे देश आहेत, जिथे भारताच्या ड्रायव्हिंग लायसन्सला परवानगी आहे. या ठिकाणी तुम्ही भारताचं ड्रायव्हिंग लायसन्स दाखवून गाडी चालवू शकता. न्यूजीलँड - जर तुमचं लायसन्स इंग्रजीमधून असेल आणि तुमचं वय 21 वर्ष असेल तर तुम्हाला 1 वर्षाची परवानगी आहे. ऑस्ट्रेलिया - इथे भारतीय लायसन्सवर अनेक भागात 3 महिने ड्रायविंग करण्याची परवानगी देण्यात येते. सिंगापूर - इथे तुम्ही एक वर्ष भारतीय लायसन्सवर गाडी चालवू शकता. त्यासाठी तुमचं वय 18 पूर्ण असणं गरजेचं आहे. दक्षिण आफ्रिका - भारतीय लायसन्सवर तुमचा फोटो असेल तर इथे तुम्ही गाडी चालवू शकता. युके - भारतीय लायसन्सवर इथे तुम्ही एक वर्ष गाडी चालवू शकता. स्वित्झर्लंड - इथे तुम्ही 1 वर्षापर्यंत गाडी चालवू शकता. स्वीडन - इथे देखील तुम्ही 1 वर्षापर्यंत गाडी चालवू शकता.