: काही लोकांना चहा प्यायला आवडतो तर काहींना कॉफी. हिवाळ्यामध्ये गरम गरम कॉफी प्यायल्यानं शरीरात उर्जा निर्माण होते.
जाणून घ्या दररोज किती कॉफी पिणे योग्य तसेच कॉफीचे फायदे...
कॉफीमुळे वजन कमी होण्यास मदत होते. कॉफी मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी तसेच हार्टची समस्या असणाऱ्या लोकांसाठी फायदेशिर ठरते.
रिपोर्टनुसार, दररोज तीन ते पाच कप कॉफी प्यावी. तसेच थकवा देखील कॉफी प्यायल्याने दूर होतो. कॉफी प्यायल्याने 10 टक्के मेटाबॉलिक रेट वाढतो
एका रिसर्चमधून असे लक्षात आले आहे की, दररोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्यानं हृदयविकाराचा धोका कमी होतो.
कॉफी पिणाऱ्या लोकांचा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे मृत्यू होण्याचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो. रिसर्चमध्ये असे मांडण्यात आले आहे की, योग्य प्रमाणात कॉफी पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे.
कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे मॅटाबॉलिज्म चांगले होते. तसेच कॉफीमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या उर्जेमुळे वजन कमी होते.
कॉफी प्यायल्याने कॅन्सर देखील होऊ शकतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात कॉफी प्यावी.
कॉफी 65 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गरम असेल तर कॉपी कॅन्सरचं कारण बनू शकते, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने सांगितलं होतं.