'तुझे मेरी कसम' या सिनेमात रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख मुख्य भूमिकेत होते. 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जवळपास 10 वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केलं. रितेश-जिनिलिया 2012 साली लग्नबंधनात अडकले. रितेश आणि जिनिलिया यांना रियान आणि राहिल ही दोन मुले आहेत. रितेश-जिनिलियाचा 'वेड' हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. रितेश-जिनिलियाच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. रितेश-जिनिलियाने 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. रितेश-जिनिलियाचा 'वेड' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. रितेश-जिनिलियाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.