जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल म्हणजेच निद्रानाशाचा त्रास होत असेल तर तुम्ही काही उपाय करू शकता.
चांगली झोप - रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधात तूप प्यायल्यास मेंदूच्या मज्जातंतू शांत होतात.
पोटासाठी उत्तम - दुधात तूप मिसळून प्यायल्याने शरीरात एन्झाइम्स बाहेर पडतात, ज्यामुळे पचनशक्ती वाढते.
निरोगी त्वचा - निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी तूप मिसळलेले दूध प्या. यामुळे आपल्या त्वचेला अनेक फायदे मिळतात.
सांधेदुखीस आराम - सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तूप आणि दुधाचे सेवन अवश्य करा. या प्रकारच्या दुधामुळे सांध्यातील जळजळ कमी होते आणि सूज कमी होते.
चयापचय वाढवते - एक ग्लास दुधात तूप प्यायल्याने पचनक्रियेवरही चांगला परिणाम होतो. यामुळे मेटाबॉलिज्म वाढते आणि पचनक्रिया चांगली राहते.
कोरोना महामारीच्या काळात आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी स्वतःला निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल म्हणजेच निद्रानाशाचा त्रास होत असेल तर तुम्ही काही उपाय करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.