गुडघेदुखीपासून मुक्तता हवी असेल तर वजन कमी करणं आवश्यक आहे.



अक्रोड, बदाम, मासे यांचा समावेश आहारात करायला हवा, यामुळे शरीर मजबूत होते.



सकाळी उठल्यावर मूठभर दुर्वांचा रस घेतल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो.



पाण्यात आल्याचा तुकडा आणि हळद घालून पाणी उकळावं त्यात मध आणि लिंबाचा रस घालून घेतल्याने गुडघ्याला आराम मिळेल.



लिंबूपाण्यात मध घालून घेतल्याने गुडघेदुखीचा त्रास कमी होतो.



रात्री दुधात हळद आणि तूप घालून प्यायल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो.



रात्रभर भिजत घातलेली मेथी पाण्यासकट घेतल्याने फायदा होतो.



मेथीचा लाडू खाल्ल्याने सांधे मजबूत होतात तसेच स्नायूंचा ताठरपणा कमी होतो.



तिळाच्या तेलात कापूर, लवंग, ओवा, मोहरी आणि सुंठ घालून गरम करावं. हे तेल गुडघ्यावर लावून मसाज करावा.



गुडघेदुखी जास्त असेल तर तिळाच्या तेलात हळद आणि चुना घालून लेप तयार करावा. गुडघेदुखीत आराम मिळतो.