भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा विचार करू नये.

वर्तमानात जगा. भविष्यकाळाचा ही विचार करू नये, कारण ते सगळे तर्क असतात आणि तेव्हा काय घडेल ते वेगळेच ठरवेल.

छंद जोपसण्यात आपला वेळ घालवला तर मनात बाकी कोणते विचार येणार नाहीत.

चंचल मन स्थिर होण्याकरिता ध्यान धारणा, प्राणायाम कर, योगासन करा यातून एकाग्रता वाढते.

मैदानी खेळ खेळा तसेच बुध्दीचे खेळ खेळा त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारेल.

आपले स्वत:चे आत्मपरीक्षण करा कारण चांगल्या आयुष्यासाठी ते महत्त्वाचे आहे.

कधीही अपेक्षा करू नका आणि जे वास्तव आहे त्याचा स्वीकार करा.

नकारात्मकतेपासून स्वत:ला दूर ठेवा. लोकांचा विचार करू नका.

समस्यंचा जास्त विचार करू नका तो सोडविण्याचा प्रयत्न करा.

१०

एखाद्या गोष्टीचा निर्णय घेताना अधिक विचाराने मन चलबिचल होते त्यामुळे निर्णय वेळेत घ्या.