भाजलं असल्यास कापूर किंवा कापराचे तेल लावा, यामुळे जळजळ दूर होईल आणि संसर्गाचा धोका टळेल.
दात दुखत असल्यास वेदना होणाऱ्या ठिकाणी कापराची पावडर ठेवल्यास त्वरित आराम मिळेल.
पाण्यात कापराच्या तुकड्यांची पूड करुन घरात हे पाणी शिंपडावं, यामुळे मुंग्यांचा त्रास कमी होईल.
पोटदुखीमध्ये ओवा आणि पुदिना, कापूर यांचे तीन थेंब टाकल्यास पोटदुखी बंद होते.
स्नायू आणि सांधे दुखत असतील तर कापराच्या तेलाने मालिश करावे. त्यामुळे वेदना थांबतील आणि आराम मिळेल.
त्वचेच्या ज्या भागावर खाज येत असेल तिथे कापूर लावल्यास खाज येणे बंद होते.
कान दुखत असल्यास तुळशीच्या पानांच्या रसात कापूर विरघळून थोडेसे कोमट करुन कानात टाकावा.
केसात कोंडा झाल्यास आवळ्याच्या तेलात कापूर मिसळून डोक्याला लावा.
गरम पाण्यात थोडेसे कापूर टाकावं, यामध्ये थोडावेळ पाय ठेवावेत यानंतर स्क्रब करावे. पायाच्या भेगांची समस्या दूर होते.
ऑलिव्ह ऑइलमध्ये कापूर मिसळून डोक्याची मालिश करावी, त्यामुळे स्ट्रेस आणि डोकेदुखी कमी होईल.