दर वर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरी केली जाते. पण लीप वर्ष असल्यानं एक दिवस जोडला गेल्याने या वर्षी 15 जानेवारीला हा सण साजरा केला जातोय. आपल्या राज्यात आपण मकरसंक्रांती म्हणतो पण बाकी राज्यांत या सणाला विविध नावं आहेत. पंजाब राज्यात या सणाला 'लोहरी' म्हणतात. तमिळनाडू मध्ये 'पोंगल' म्हणतात. आसाम मध्ये 'मेग बिहू'. 'मेग मेला' असं मध्य आणि उत्तर भारतात बोललं जातं. उत्तर प्रदेशात याला 'खिचडी संक्रांत' म्हटलं जातं. काश्मीरमध्ये 'शिशूर सेनक्रांथ' म्हणतात. आणि महाराष्ट्राप्रमाणे 'कर्नाटक, तेलंगणा' मध्ये मकर संक्रांत म्हणतात.