विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल स्टार्कने आयपीएलच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
कोलकात्याने स्टार्कसाठी 24.75 कोटींची ऐतिहासिक बोली लावून या खेळाडूला खरेदी केले आहे.
यामुळे मिचेल स्टार्क आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
या खेळाडूने इंग्लंडचा सॅम करन, ऑस्ट्रेलियाचा कॅमरुन ग्रीन, इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिससह सर्व जुन्या महागड्या खेळाडूंचे रेकॉर्ड मोडले आहेत.
मिचेल स्टार्कसाठी चार संघामध्ये बिडिंग टेबलवर लढत झाली.
मिचेल स्टार्कसाठी दिल्ली आणि मुंबई या दोन संघामध्ये आधी लढत झाली.
10 कोटींपर्यंत बोली पोहचल्यानंतर दिल्लीने माघार घेतली.
त्यानंतर कोलकात्याने रस दाखवला. मुंबईने माघार घेतली.
पण त्याचवेळी गुजरातनेही रस दाखवला. कोलकाता आणि गुजरात या दोन संघामध्ये स्टार्कसाठी चुरस पाहायला मिळाली.