'या' कायद्यानुसार, हिंदू आणि मुस्लिम लग्न करु शकतात? भारतात एका कायद्यानुसार, दोन वेगवेगळ्या धर्मीय लोक धर्म बदलल्याशिवाय लग्न करु शकतात. विशेष विवाह कायदा, 1957 नुसार, हिंदू आण मुस्लिम धर्मीय एकमेकांसोबत लग्न करु शकतात. भारतीय संसदेने 1954 मध्ये विशेष विवाह कायदा म्हणजेच स्पेशल मॅरेज अॅक्टला मंजुरी दिली. विशेष विवाह कायद्याअंतर्गत लग्न करण्यासाठी 30 दिवस आधी विवाह नोंदणी निबंधकाकडे पाठवावं लागतं. विशेष विवाह कायदा बहुविवाह म्हणजे एकाहून जास्त विवाहांना मान्यता देत नाही. विशेष विवाह कायद्यानुसार, लग्न करण्यासाठी मुलाचं वय 21 वर्षं आणि मुलीचं वय 18 वर्ष असणं बंधनकारक आहे. विशेष विवाह कायदा भारतातील सर्व धर्मांसाठी लागू होतो. विशेष विवाह कायद्यानुसार, धर्म परिवर्तन न करता दोन विविध धर्माचे लोक लग्न करू शकतात. विशेष विवाह कायद्यानुसार केलेल्या लग्नाला कायदेशीर मान्यता आणि लाभ तसेच सुरक्षा देखील मिळते.