पीनट बटरमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन-बी3, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन-बी5, लोह, पोटॅशियम, झिंक आणि सेलेनियम आढळतात, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.



पीनट बटरमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात. जे हृदयरोगाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते.



हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पीनट बटरचा समावेश करू शकता. पीनट बटरमध्ये लोह आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळते.



पीनट बटर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका देखील कमी होतो.



पीनट बटरमध्ये भरपूर कॅलरीज, प्रोटीन आणि फायबर आढळतात. यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते.



डोळे निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ईचे सेवन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण व्हिटॅमिन ई डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या टाळू शकते.



पीनट बटरच्या सेवनाने हृदय निरोगी राहण्यास मदत होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.