अभिनेत्री हिना खान सद्या मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. हिना खाननं नुकतेच इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हिना डीप नेक शॉर्ट ड्रेसमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे. हिना खान मेकअप शिवायही तितकीच सुंदर आहे, हे या फोटोंमध्ये दिसून येतंय. गॉगल आणि नेकपिससह हिनाने हा लूक पूर्ण केला आहे. हिना खान छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. हिना तिच्या कामापेक्षा तिच्या लूक आणि स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. हिना नेहमी तिच्या नव्या लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर हिनाच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे. हिना खानने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.