नुकत्याच रिलीज झालेल्या 'ओ सजना' या गाण्यासाठी गायिका नेहा कक्करला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.
आता नुकतीच नेहानं एक पोस्ट शेअर करुन ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.
'आज मी जसं आयुष्य जगत आहे, तसं आयुष्य खूप कमी लोकांना मिळतं. मी इतक्या लहान वयात खुप चांगलं आयुष्य जगत आहे. फेम, अगणित हिट गाणी, सुपरहिट टीव्ही शो, वर्ल्ड टूर, लहान मुलांपासून ते 80-90 वर्षांपर्यंतचे चाहते आणि काय हवं!' असं नेहानं पोस्टमध्ये लिहिलं.
पुढं नेहानं लिहिलं, 'माझी प्रतिभा, आवड, मेहनत आणि सकारात्मकतेच्या जोरावर मी हे सर्व कसे मिळवले हे तुम्हाला माहीत आहे. म्हणूनच आज माझ्याकडे जे काही आहे त्याबद्दल मी देवाचे आभार मानायचे आहेत.'
'धन्यवाद! मी या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे.' अशी पोस्ट नेहानं शेअर केली आहे. नेहाच्या या पोस्टनं अनेकांचं लक्ष वेधलं.
नेहा कक्करच्या 'ओ सजना' या गाण्यात धनश्री वर्मा आणि प्रियांक शर्मा या कलाकारांनी काम केलं आहे.
19 सप्टेंबर रोजी नेहा कक्करचं हे गाणं रिलीज झालं.
गायिका नेहा कक्कर रिमिक्स गाण्यासाठी ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
यापूर्वीही तिने अशीच अनेक जुनी गाणी रिमिक्स केली असून, त्यामुळे तिच्यावर बरीच टीका झाली आहे.