पंजाबची सुपरमॉडेल, गायिका आणि अभिनेत्री हिमांशी खुराना सध्या तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आहे हिमांशी खुरानाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती देसी लूकमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर येताच, अभिनेत्रीचे फोटो इंटरनेटवर हिट झाले आहेत. तिच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले आहे या फोटोशूटमध्ये हिमांशीचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे. तिने यात निळ्या रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे हिमांशी खुरानाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोक फॉलो करतात. त्याचबरोबर हिमांशी तिच्या चाहत्यांसाठी वेळोवेळी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते हिमांशीच्या खास स्टाइलचे लाखो चाहते आहेत बिग बॉस सीझन 13 मध्ये असीम रियाझसोबतच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत आलेली हिमांशी खुराना एक प्रसिद्ध सेलिब्रिटी बनली आहे आपल्या अभिनयासोबतच तिने आवाजाची जादूही लोकांवर खूप चालवली आहे