हेमांगी कवीच्या ‘जन्मवारी’ या नाटकाचे प्रयोग विविध ठिकाणी होत आहेत. नुकताच या नाटकाचा प्रयोग मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झाला.



हेमांगीनं रॉयल ऑपेरा हाऊसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.



रॉयल ऑपेरा हाऊसमधील फोटो शेअर करुन हेमांगीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मला कुठल्याही नाट्यगृहात प्रयोग करायला आवडतंच पण ‘साला एकदा तरी या रॅायल ॲापेरा मध्ये प्रयोग करायचाय यार’ ही अनेक वर्षांपासूनची इच्छा होती! काल मुंबईच्या रॅायल ॲापेरा हाऊस मध्ये आमच्या ‘जन्मवारी’ नाटकाचा रॉयल प्रयोग झाल्यामुळे माझी ही पण इच्छा पूर्ण झाली!'



पुढे हेमांगीनं पोस्टमध्ये लिहिलं, 'खरंच नावाप्रमाणे सगळा रॉयल कारभार. नाट्यगृहाचं interior, lights, decorum, greenrooms, त्यातलं furniture, स्वच्छता, corridors, रंगसंगती, sound system, भव्य दिव्यपणा! क्या बात है. सगळंच विलक्षण!'



'अनेक वेळा मी या नाट्यगृहाला बाहेरून बघितलंय. म्हणजे रीतसर तिकीट काढून प्रेक्षक म्हणून नाट्यगृह नक्कीच बघता आलं असतं पण आपण ठहरे कलाकार!आत पाऊल ठेवेन ते माझ्या नाटकाचा प्रयोग करायलाच”! या खुळ्या निग्रहामुळे खूप वर्ष वाट पाहावी लागली खरंतर मला पण ते वाट पाहणं वर्थ होतं असंच वाटलं!' असंही हेमांगीनं पोस्टमध्ये लिहिलं.



हेमांगीनं पोस्टमध्ये लिहिलं, 'धन्य धन्य! माझा हा निग्रह पुर्ण करण्याची आणि प्रयोग सादर करण्याची संधी मिळाली ते ‘नाट्यधारा’ नाट्यमहोत्सवामुळे. संपूर्ण भारतातून काही नाटकांची निवड केली होती त्यात ‘जन्मवारी’ नाटक निवडल्याबद्दल नाट्यधारा निवडसमीतीचे आणि अनेक वर्षांपासून रंगभूमीची ज्या मनापासून जोपासना करताएत असे आमचे Ravi Mishra sir यांचे खूप खूप धन्यवाद!'



हेमांगीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ब्लू स्कर्ट, व्हाईट शर्ट अशा लूकमध्ये 'रॉयल ऑपेरा हाऊस'मध्ये उभी असलेली दिसत आहे.



हेमांगीनं शेअर केलेल्या फोटोवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हेमांगी किती छान लिहिलं आहेस, तू जशी आवडतेस, तुझ्या reels, तुझा attire आवडतो तसचं तुझे लिखाणही आवडतं.'



'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



मांगी ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते.