लोक अनेकदा नारळाची साल कचऱ्यात फेकताना दिसतात.या सालींचा वापर अशा कामात केला जाऊ शकतो नारळाच्या सालीची पावडर बनवून त्यात हळद मिसळून जळजळ झालेल्या भागावर लावा नक्कीच फरक पडेल. नारळाच्या सालीने दातांचा पिवळेपणा दूर होतो. नारळाची साल केसांसाठीही खूप फायदेशीर असते.नारळाच्या शेंड्या कढईत गरम करुन घ्याव्यात. शेंड्या चांगल्या भाजल्या गेल्या की त्याची मिक्सरमधून बारीक पावडर करावी ही पावडर खोबरेल तेलात मिसळून हे मिश्रण केसांना लावावी. नारळाच्या सालीने मूळव्याधाची समस्या दूर होऊ शकते. नारळाची साल हे एक स्क्रबरचं काम करतं ,घरातील भांडे धुण्यासाठी वापर करू शकता, भांड्यांना वेगळी चमक मिळू शकते. तसेच तुम्ही नारळाच्या सालींनी पक्ष्याचे बनावट घरटे सुध्दा बनवू शकता