दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी उपाय शोधात असाल,तर पुढील उपाय तु्म्ही करू शकता संत्र्याची साल आणि तुळशीची पानं वाळवून त्याची पूड तयार करावी. रोज दात घासल्यानंतर या पावडरने दातांना मसाज करावा. केळ्याच्या सालीचा उपयोगही दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी होतो. केळ्याच्या सालीचा आतील पांढरा भाग दातांवर घासावा. बेकिंग सोड्यात चिमूटभर मीठ आणि थोडं पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट दोन ते तीन मिनिटं दातांवर चोळा. टोमॅटोच्या रसाने नियमित दातांना मसाज करावा, यामुळे दातांवरचा पिवळेपणा दूर होतो. अर्धा चमचा मीठ घ्या आणि त्यात राईच्या तेलाचे काही थेंब व्यवस्थित मिसळा आणि या मिश्रणाने दात घासा. कडूनिंबामध्ये अँटीसॅप्टिक गुणधर्म असतात , कडूनिंबाने दात घासल्यास पांढरे व मजबूत राहतात. तसेच हळद मोहरीचे तेल आणि मीठाने ब्रश करा त्यामुळे दात मजबूत होतील आणि दातांचा पिवळेपणाही निघून जाईल