कोरोनाकाळानंतर (Coronavirus) लोकांमध्ये हदयविकारांचं प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. हार्ट अटॅकच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
अलिकडेच गरबा खेळत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने देशातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये राज्यातील चार जणाचा समावेश असून मुंबईत दोघांचा मृत्यू झाला आहे.
डॉक्टरांच्या मते, वाढत्या हदयविकाराचं कारण म्हणजे सध्याची लाईफस्टाईल आणि कोरोना संक्रमण आहे. कोरोना संक्रमणामुळे हदय कमकुवत होतं असल्याचं तज्ज्ञांचं मतं आहे.
हदयविकाराचं मुख्य कारण म्हणजे तणाव, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि खाण्या-पिण्याची ही यामागची कारण आहेत. याशिवाय कोरोना संसर्गाचाही यावर परिणाम होत आहे.
कोरोना विषाणू हदयासह शरीराच्या विविध भागांवर परिणाम करतो, यामुळे तुमचं शरी कमकुमत होतं.
कोरोनामुळे फुफ्फुसं आणि हदयावर वाईट परिणाम होतो, त्यामुळे कोरोना संसर्गानंतरही हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे.
डॉ. गुप्ता यांच्या मते कोरोना विषाणू हदयावरही परिणाम करतो.
सुरुवातील कोरोना विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करत होता. मात्र कोरोना विषाणूमुळे फुफ्फुसांना कमी ऑक्सिजन पुरवठा झाला, परिणामी हदयालाही कमी ऑक्सिजन पुरवठा झाला.
ज्या रुग्णांना कोरोना संसर्ग झाला त्या रुग्णांच्या हदयाची कार्यक्षमताही (रक्त शुद्ध करून शरीराच्या विविध भागात पोहोचवण्याची क्षमता/पंपिंग कॅपॅसिटी) कमी झाली, अशा लोकांना हदयाविकाराचा धोका असतो.