अनेकदा लोक फळांचं सॅलड बनवून खातात. यावेळी बहुतेक जण फळांवर मीठ, साखर किंवा चाट मसाला टाकून फळं खातात. यामुळे फळांची चव वाढते.


काहीवेळा लोक फळाचा गोडवा वाढवण्यासाठी फळ कापून त्यावर साखर टाकून खातात.


जर तुम्हालाही कापलेली फळं वरून साखर, मीठ किंवा चाट मसाला घालून खायला आवडत असतील तर काळजी घ्या.


अशाप्रकारे मीठ आणि साखर टाकून फळांचं सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कापलेल्या फळावर मीठ शिंपडले की ते पाणी सोडू लागते. यामुळे फळांमधील पोषक तत्वे निघून जातात.


मीठ किंवा चाट मसाल्यामध्ये असलेले सोडियम किडनीवर परिणाम करते.


जर तुम्ही फळांवर चाट मसाला आणि मीठ दोन्ही टाकून खाल्लात तर शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त होते, कारण चाट मसाल्यातही मीठ असते. हे शरीरासाठी नुकसानदायक आहे.


फळ नैसर्गिकरित्या गोड असतात. फळांमध्ये ग्लुकोज असते. यामुळे फळांचे सेवन केल्याने शरीरात कॅलरीज वाढतात.


अशात तुम्ही फळांवर अधिक साखर टाकून खाल्याने शरीरात साखरेचं प्रमाण वाढते. यामुळे मधुमेहाची समस्या उद्भवू शकते.