योगा विषयी नेहमी म्हटले जाते की योगा करण्यासाठी वयाची अट नसते.

वृध्द लोकांसाठी योगा करण्यासाठी खुप त्रास होतो.

चला तर जाणून घेऊ वृध्द व्यक्ती कोणते योगासन एकदम आरामात करू शकतात.

ताडासन

हे आसन शरीर सरळ ठेवण्यास आणि संतुलन सुधारण्यास मदत करते. भिंतीचा आधार घेऊन हळूवारपणे करता येते.

वृक्षासन

हे आसन एका पायावर उभे राहून संतुलन साधण्यास मदत करते. गरज वाटल्यास खुर्ची किंवा भिंतीचा आधार घ्यावा.

भद्रासन

जमिनीवर बसून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळवून हळूवारपणे मांडीचे स्नायू मोकळे होतात. कंबर आणि गुडघ्यांसाठी आरामदायी.

बालासन

गुडघ्यांवर बसून कपाळ जमिनीला टेकवून हात पुढे किंवा मागे ठेवून आराम करणे शांत आणि आरामदायक आसन आहे.

शवासन

पाठीवर झोपून शरीर पूर्णपणे शिथिल सोडणे हे सर्वात आरामदायी आसन आहे. यामुळे मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होतो.

सुखासन

मांडी घालून आरामात बसणे आणि पाठीचा कणा सरळ ठेवणे. ध्यान आणि प्राणायामासाठी उत्तम.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.