दूध हे सर्वात पौष्टिक आहार मानला जातो. दुधामध्ये विशिष्ट प्रकाराचे व्हिटॅमिन आणि मिनरल्स पाहायला मिळतात.

यामुळे डॉक्टर सर्वांना रोज एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला देतात.

पण तुम्ही कधी ऐकले आहे का या जगात असे काही प्राणी आहेत ज्यांच्या दुधात अल्कोहोल पाहायला मिळते.

चला तर जाणून घेऊ ते कोणते प्राणी आहेत.

हत्तीण

हत्तीणी अशी एक प्राणी आहे तिच्या प्राण्यांमध्ये दारू सारखी नशा असते.

काही रिपोर्ट नुसार असा दावा केला गेला आहे की हत्तीनीच्या दुधात 60 टक्के अल्कोहोल सारखे घटक मिळतात.

हत्तीणीच्या दुधात अल्कोहोल असणे याचे खर कारण म्हणजे ऊस, हत्तीणी ला ऊस खुप आवडतो यामुळे हत्तीनी ऊसाचे सेवन खुप करते.

ऊसामध्ये जास्त प्रमाणात अल्कोहोल बनवण्याचे तत्त्वे असतात. याच कारणामुळे हत्तीणीच्या दुधात अल्कोहोल पाहायला मिळते.

हत्तीणीच्या दुधामध्ये काही प्रकारचे धोकादायक कॅमिकल्स मिळतात. हे हत्तीणीचे दूध माणसांसाठी खुप धोकादायक असू शकते.

हत्तीणीच्या दुधामध्ये प्रोटीन सोबत फॅट पण काही प्रमाणात मिळतात. आणि माणूस हे पचन नाही करू शकत. जर माणसाने हे दूध पिल्यास माणसाला पचनक्रियेत अनेक समस्या होऊ शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.