एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्याला स्पर्श करता तेव्हा तुम्हाला विजेचा शॉक बसतो, हे हिवाळ्यात प्रामुख्याने घडते. अचानक एखाद्याला स्पर्श केल्यास विजेचा शॉक लागणे असामान्य नाही.
हा विजेचा धक्का का आणि कसा बसतो आणि आपल्यासाठी हानिकारक आहे का? हे वाचा.
जेव्हा एखादी व्यक्ती किंवा वस्तूमध्ये जास्त इलेक्ट्रॉन असतात, तेव्हा ते नकारात्मक चार्ज तयार करतात.
अशाप्रकारे हे इलेक्ट्रॉन इतर वस्तू किंवा व्यक्तीच्या सकारात्मक इलेक्ट्रॉन्सकडे आकर्षित होतात.
आपल्याला जाणवणारा धक्का हा या इलेक्ट्रॉनच्या वेगवान हालचालीचा परिणाम आहे. त्यामुळे असा सौम्य विजेचा शॉक बसतो
हिवाळ्यात किंवा आपल्या सभोवतालचे हवामान कोरडे असताना इलेक्ट्रिक चार्जेस सर्वात जास्त तयार होतात.
हिवाळ्यात हवा कोरडी होते आणि आपल्या त्वचेच्या पृष्ठभागावर इलेक्ट्रॉन सहज तयार होतात. त्यामुळे थंडीच्या मोसमात असा सौम्य विजेचा करंट जाणवतो.
उन्हाळ्यात, गरम वातावरणामुळे हवेतील ओलावा नकारात्मक चार्ज असलेले इलेक्ट्रॉन नष्ट करतात आणि यामुळे आपल्याला उन्हाळ्यात असा विद्युत करंट जाणवत नाही.