लिंबू प्रमाणेच लिंबाच्या सालीचेही अनेक फायदे आहेत.
लिंबाच्या रसापेक्षा लिंबाच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर न्यूट्रियंट्स जास्त असतात.
लिंबाची साल हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. लिंबाच्या सालीमुळे हाडे मजबूत होतात.
लिंबूच्या सालीमध्ये व्हिटॅमीन सी आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात असते.
लिंबाची साल आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिसवर गुणकारी असते.
लिंबाच्या सालीमध्ये पेक्टिन नावाचं तत्व असतं, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीचा चहा सेवन करू शकता.
लिंबाच्या सालीमध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट वृद्धत्व दूर करण्यास मदत करते.
लिंबाची साल नियमितपणे चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होऊन अकाली वृद्धत्व दूर होण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.